माझा सिंह गेला - भाग-१

  • 9.6k
  • 2
  • 4.5k

भाग 1 - गड आला पण माझा सिंह गेला(प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) तानाजीच्या अन त्याच्या शूर मावळ्यांच्या रक्ताने गडाला आधीच अभिषेक झाला होता, आता त्याच मावळ्यांच्या अश्रूंच्या जलधारा मातीत मिसळून कोंढाणा कृतकृत्य पावत होता. तानाजीच्या निश्चल देह पालखीमध्ये चिरविश्रांती घेत होता. राजे आपल्या लाडक्या तानाजीच्या देहाला बिलगून धाय मोकलून रडत होते. तानाजीच्या देहाला घट्ट बिलगून हमसून हमसून रडणाऱ्या राजांना पाहून तिथं उभा असणाऱ्या एकूण एक मावळ्यांचे डोळे अश्रू धारांनी भरून वाहत होते. 'ताना