वाहिनीवाल्यांना पत्र

  • 9.6k
  • 3k

****************** वाहिनीवाल्यांना पत्र ! **************प्रति,मराठी वाहिनी मालिका निर्माते,स. न. वि. वि.वास्तविक पाहता गेली बारा-पंधरा वर्षे झाली आहेत, विविध वाहिन्यांंचे जाळे घरोघरी पोहोचले आहे. हळूहळू वाहिन्यांवरील कार्यक्रमांनी आणि विशेषतः त्यावरील मालिकांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली, एक प्रकारे मोहित केले. सिनेमागृहात जाऊन, प्रचंड धक्काबुक्की सहन करून जे आम्हाला बघायला मिळत होते ते गेली अनेक वर्षे आम्हाला घरबसल्या सहकुटुंब पाहायला मिळते आहे. सिनेमा, नाटक यापेक्षा निराळे माध्यम म्हणजे तुम्ही प्रसारित करीत असलेल्या मालिका! एका अर्थाने जे सिनेमागृहाच्या पडद्यावर पाहायला मिळत नाही किंवा दोन अडीच तासात जे तिथे अत्यंत त्रोटक, धावत्या समालोचनाप्रमाणे पाहायला मिळते ते सविस्तरपणे, बारीकसारीकरितीने चार भिंतीच्या आत घरी बसून