अहिराणी लोकपरंपरा - पुस्तक परीक्षण

  • 37.3k
  • 7.6k

पुस्तक परीक्षण "अहिराणी लोकपरंपरा" लेखक- डॉ. सुधीर देवरे प्रकाशक-ग्रंथाली प्रकाशन, मुंबई भारत अनेक लोकपरंपरेनी नटलेला देश आहे. पिढी दर पिढी या परंपरा काळासोबत पुढे चालत रहातात. या प्रवासात कधी सोयीनुसार बदल केले जातात तर कधी परिस्थितीमुळे नकळत घडत असतात. अशीच एक लोकपरंपरा जपण्याचे आणि ती सगळ्यांपर्यन्त पोहचवण्याचे कार्य डॉ. सुधीर देवरे यांनी "अहिराणी लोकपरंपरा" या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. या पुस्तकाच्या प्रास्ताविकेत लेखकाने त्यांचे जन्मगाव विरगावातील अनुभवसमृद्धीचे जे शब्दचित्र रेखाटले आहे त्यावरुन या पुस्तकाची निर्मिती केवळ अभ्यासकाच्या दृष्टीकोनातून न होता त्यांच्या अनुभूतीचे, लोकसाहित्याबद्दल आस्था, ती जपण्याची तळमळ आणि सर्वांपर्यन्त पोहचवण्याचा मानस यांच्या संयुक्ताने झाली आहे. लेखक डॉ.सुधीर देवरे हे भाषा,