परतीची भेट प्रत

  • 10k
  • 2.4k

परतीची भेट प्रत सकाळची वेळ होती. बेड टी घेत घेत वर्तमान पत्रावर नजर टाकत होतो. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. हातातील वर्तमानपत्र बाजूला ठेवले. मोबाईल एका अनोळख्या व्यक्तीचा होता. त्याने बोलायला सुरवात केली, “ नमस्कार. काय कशी काय आहे तब्येत? बऱ्याच दिवसापासून तुम्हाला भेटण्याची इच्छा होती. आज योग आला बघा. तुमच्या गावावरूनच देवदर्शनासाठी जाणार होतो. विचार केला भेटावे तुम्हाला. गप्पा माराव्यात. वहिनींच्या हातचे चहा कांदेपोहे घ्यावेत व निघावे पुढच्या प्रवासाला. “ आवाजावरून व बोलण्याच्या प्रकारावरून ओळखले की गेल्या साहित्य संमेलनात भेटलेले हे साहित्यिक गृहस्थ. त्यांनी मला आवर्जून भेटण्याचे आश्वासन दिल्याचेही मला आठवले. कशी आहे तब्येत? अस विचारणाऱ्या लोकांचा मला खर तर रागच