रुद्रा ! - ६

(13)
  • 8.5k
  • 5k

राघवने राकेशला जसवंतचे फिंगर प्रिंट्स डेड बॉडी वरील प्रिन्टशी जुळवून पाहण्यास सांगून फोन कट केला. कॉफी मगात राहिलेल्या कॉफीचा शेवटचा सिप घेतला. काही क्षण विचार केला. मोबाईल उचलला. "हॅलो राधा, मी राघव बोलतोय.""कोण राघव? मी नाही ओळखत कुण्या राघवला !" राधेने तुसडेपणाने उत्तर दिले. "अहो मी इन्स्पे. राघव बोलतोय!"मग मात्र राधा घाबरली. दोन दिवसाखाली पोलिसांनी तिच्या ऑफिसात येऊन सगळ्या स्टाफची जबानी घेतली होती. या मोठ्या लोकांच्या भानगडी अन मधेच बाकीच्यांना ताप होतो. तिच्या कंपनीच्या मालकाचा मुडदा त्याच्याच आऊट हाऊस मध्ये सापडला म्हणे. त्याच्या चौकशीसाठी अख्या स्टाफला पोलिसांनी दिवसभर वेठीस धरले होते. सगळ्यांचे फोन नम्बर, घराचेपत्ते आणि इतर माहिती पोलीस घेऊन गेले होते. तेव्हा हा राघव कडक