ना कळले कधी Season 2 - Part 1

(30)
  • 32.3k
  • 7
  • 25.6k

आर्या, i am talking with you! आर्या ! सिद्धांत मीटिंग मध्ये आर्याच्या नावाने ओरडत होता. तरीही तिचे लक्षच नव्हते. आर्या!तो जोरात ओरडला आणि आर्याची तंद्री भंगली,काय सर काही म्हणालात. लक्ष कुठे असत ग तुझं मी किती वेळचा बोलतोय! मूर्ख आहे का मी ?की इथे बसलेले बाकीचे मूर्ख आहेत? तो पुन्हा तिच्यावर ओरडायला लागला. 'मला ना हल्ली तुझं काय करावं कळत नाही आहे. तुझं अजिबात कामात लक्ष नाही', 'कुठून घेतात असे लोक कंपनी वाले पण!' तो अजूनही रागात च बोलत होता. आर्या ला ह्या बोलण्याचा काहीही फरक पडत नव्हता.तिने तर आता सवयच करून घेतली होती.सिद्धांत पण कळाल चिडून काहीही फायदा नाही