प्रिय मातेस पत्र

  • 11.9k
  • 1
  • 4.5k

●●●●●● प्रिय मातेस पत्र !●●●●●● माझी प्रिय आई, तुला शतशः नमन।तुझे अनंत उपकार. केवळ तुझ्यामुळेच मी या सुंदर, रमणीय, मनमोहक जगात पाऊल ठेवू शकले. पण, खरे सांगू का आई, तुझ्या उदरात घालवलेला काळ जणू माझ्यासाठी स्वर्गात विहार करत असल्याप्रमाणे होता. तुझ्या पोटात असतानाही मी तुला भरपूर त्रास दिलाय ग! पण आई, तू तो सारा त्रास मोठ्या आनंदाने सहन तर केलासच पण कधी तुझ्या चेहऱ्यावरील समाधान कमी होऊ दिले नाही. तुझ्या पोटात असताना मी मस्त बागडायचे, खेळायचे, तुला मधूनमधून लाथाही मारायचे पण तू कधीच राग केला नाहीस की कधी