रामाचा शेला.. - 5

  • 12.8k
  • 6.1k

सरला सचिंत होती. उदयचे गेल्यापासून पत्र नाही. ती रोज वाट पाही. आज येईल, उद्या येईल. परंतु महिना झाला तरी पत्राचा पत्ता नाही. मे महिना संपत आला आणि जून उजाडला. मृग नक्षत्र सुरू झाले. पावसाळा आला. परंतु उदय आला नाही. कोठे आहे उदय? काय झाले त्याचे? त्याची आई का बरी नाही? त्याची व आईची भेट नसेल का झाली? परंतु तो कोठे आहे? त्याचा पत्ताही माझ्याजवळ नाही. इतके दिवस आम्ही एकत्र होतो. भेटत होतो. बोलत होतो. परंतु त्याचा पत्ता नाही घेऊन ठेवला. कोठे त्याला पत्र लिहू? कोठे त्याला पाहू? कोठे शोधायला जाऊ?