निशांत - 3

(17)
  • 40.6k
  • 32.7k

हलके हलके सोनालीने अन्वयाला शांत केले. तिला अन्वयाचा कायमचेच मुंबईला जायचा निर्णय पटला. आता ती तिच्या माहेरीच “सुरक्षित” राहणार होती आणि मग या “विश्वासघातकी” दिराचा चांगला समाचार घ्यायचा. अन्वया घरी आल्याने सुमित जरा खुशीत होता. वहिनीचा “विश्वास” होताच त्याच्यावर आता तर दादाची पण अडचण दूर झाली होती. त्याला माहीत होते की हे घरचे पाहुणे गेले की अन्वया त्याचीच होती.