निशांत - 2

  • 41k
  • 37k

अन्वया गेल्यावर खरेतर सोनालीला चुकल्या चुकल्या सारखे वाटायला लागले. कारण गेले महिनाभर त्या दोघी सतत एकमेकासोबत होत्या. परीक्षा संपल्या संपल्या मैत्रिणींच्या सेंडऑफ पार्टी ठरल्या होत्या त्यासाठी पण अन्वया नाही थांबली.तिला मुंबईला जायची फार गडबड झाली होती. याआधी अन्वयाने आणि सोनालीने ठरवले होते परीक्षेनंतर अन्वयाच्या सगळ्या मैत्रिणींना आपल्या घरी पण एक मोठी पार्टी द्यायची, काय माहिती निकालानंतर सर्वांचे मार्ग वेगळे झाल्यावर कधी परत भेटी होतील या सर्वांच्या.