०८ मे, २०१८ सकाळी ५ वाजताच उठलो.. झोप पूर्ण झाली नव्हतीच, हवेत प्रचंड गारठा होता त्यामुळे परत पांघरुण ओढून झोपायचा मोह आवरत नव्हता. शेवटी २ मिनिटं, ५ मिनिटं करुन उठलो, पटापट आवरु म्हणूनही ६.१५ होऊन गेले होते. अजून मेट्रो पकडायची होती, तेथून पुढे काही अंतर चालून जाऊन मग ब्रुजला जाणाऱ्या बसचा थांबा होता. धावतच खाली उतरलो, काही अंतर पुढे गेलो आणि लक्षात आले, अरे आपण दुसऱ्या देशात चाललोय, दुसऱ्या गावाला नाही. व्हिसा, पासपोर्ट काहीच बरोबर घेतले नव्हते. परत माघारी येऊन पासपोर्ट्स घेतले आणि अक्षरशः धावतच स्टेशन गाठले. अर्थात त्यामुळे डोळ्यावर असलेली झोप उडून गेली. दोनच मिनिटांत मेट्रो आली. मेट्रोचे अंतरंग