"हकुना मटाटा" तो एक ओंगळवाणा,कुरुप राक्षस असतो...पण क्रूर नसतो...एका गावात मानवी वस्तीपासून आपल्याच विश्वात मग्न असतो...पण काही कारणांमुळे त्याला स्वतःचे गाव सोडावे लागते...आणि तो पुढे प्रवासाला निघतो...आणि काही कारणांमुळे एक सुंदर राजकुमारीला सुखरूप सोडवून राजवाडयात सोडण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडते... पुढे प्रवासात राजकुमारीला कळते .. हा फक्त दिसायला कुरुप आहे मात्र मनाने एक राजहंस आहे...ती त्याचा प्रेमात पडते..इथे हा राक्षसही हळूहळू तिच्यावर भाळतो ..इतक्या आपुलकीने त्याच्या बरोबर कुणीही वागलेलं नसते...एक रात्री ते एके ठिकाणी मुक्कामाला थांबतात..आणि सकाळी पुढे निघणार..तेव्हा त्या राजकुमारीचे रूपांतर एका राक्षसी मध्ये झाले असते...तेव्हा ती राजकुमारी त्याला आपल्या शापाबद्दल त्याला सांगते..त्यालाही बरे वाटते ...आपल्याला आल्यासारखा कोणीतरी साथीदार