प्रलय - १९

  • 6.5k
  • 3.2k

प्रलय-१९    जेव्हा आयुष्यमानचे डोळे उघडले तेव्हा त्याला जाणवलं तो कोणाच्या तरी शय्याकक्षात होता . लुसलुशीत गादी त्याच्या शरीराला आरामदायी वाटत होती .  त्याने आजूबाजूला पहिले एका बाजूला ते दोन बुटके आपली मान खाली घालून उभे होते . दुसऱ्या बाजूला एक म्हातारा माणूस त्याच्या शेजारी  बसलेला होता . तो काही बोलणार त्याआधीच म्हातारा म्हणाला....." तुझ्या मनात बरेच प्रश्न असतील सार्‍या प्रश्नांची उत्तरे तुला आता मिळणार नाहीत . पण काही प्रश्नांची उत्तरे मी तुला सांगेन .  ती म्हणजे तुझी सुरुकुने निवड केली आहे ......ज्यावेळी प्रलयकारिका जागृत होते . त्यावेळी प्रलयकारिकेचा सामना करण्यासाठी प्रलयकारिकेला हरवण्यासाठी ,  किंवा प्रलयकारिकेला नष्ट करण्यासाठी सुरुकु एकाची