प्रलय - १८

  • 7.9k
  • 3.3k

प्रलय-१८      भिती म्हणजे काय याचा खरा अर्थ आयुष्यमानला आता समजला होता . तो बुटका नक्कीच नरभक्षी होता .    त्यांनं जेवढे म्हणून सुटायचे प्रयत्न करता येतील तेवढे केले होते ,  पण त्या बेड्यामधून सुटणे अशक्य होतं . तो बुटका आता मोठ्या चाकुला धार लावत होता .  नक्कीच त्याचा मृत्यू त्याला जवळ दिसत होता .        त्यावेळीच आजूबाजूने चित्रविचित्र आवाज येऊ लागले . कोणतातरी प्राणीही जोरजोरात ओरडत असल्यासारखे वाटत होते .  पण असा आवाज आयुष्यमान यापूर्वी कधीच ऐकला नव्हता . मात्र तो आवाज ऐकून ते बुटका व बुटकी जरा जरा घाबरल्यासारखे वाटले दोघेही पटकन तळघरातून वर निघाले .