अँटी ग्रेविटेशनल मॅन- द सुपरहिरो

  • 14.1k
  • 5.1k

नवं दाम्पत्य क्रिस आणि मारिना, जे लग्नानंतर पहिल्यांदा महाबळेश्वरला आलेत. सात दिवसाची ही ट्रिप आटोपून परत आपल्या घरी नागपूरला आलेत. त्यांच्या क्रिसच्या घराचे लोक खूप प्रेमळ आणि मनमिळावू तसेच ते दोघेही होतेच. त्यांचा प्रेमविवाह झालेला होता. त्यांच्या प्रेमविवाहला दोघांच्याही घरच्यांचे समर्थन होते. काही दिवस सुखातच गेलेत. लग्नाच्या दुसऱ्या महिन्यातच ती गरोदर राहिली. त्यांना नुकतेच कळाले की त्यांचा घरी नवा पाहूना येणार आहे. सारेच खूप आनंदात होते. एवढ्यात मारीनाची घराचे सारेच जण काळजी घेऊ लागले, खास करून तिचा पती क्रिस. तो आपल्या होणाऱ्या बाळाबद्दल खूप उत्सुक होता. तो त्याला साऱ्या सुख सुविधा पुरविण्यास तैयार होता.