तो काहीच न बोलता समोर निघाला, ती ही त्याच्या मागे मागे गेली. 'सर मी काहीतरी विचारलं आहे?', त्याचं उत्तर नाही मिळालं मला. सिद्धांत काहीही उत्तर देत नव्हता. आर्याने त्याचा हात पकडला आणि थांबवलं, 'मी तुमच्याशी बोलतीये ना. मूर्ख आहे का मी एकटीच बडबड करायला.' 'आर्या, हे बघ काही प्रश्नांना उत्तरे नसतात त्यातलाच हा समज.', असं म्हणून तो चालू लागला. आर्याला काय बोलावं कळलंच नाही. तिने पटकन विषय बदलला, 'तुम्हाला नाही घ्यायचं काही?' 'काय?', सिद्धांत म्हणाला. त्याला आर्या इतक्या लवकर हा विषय सोडेल असं त्याला वाटलंच नव्हतं. बर झालं हिने दुसरा विषय काढला. तो मनातच म्हणाला. 'नाही मला काही विशेष