कनिका दिसायला सावळी पण तेज बाण्याची . स्वभावाने तेवढीच नम्र . मनात मालती बद्दल तिच्याही आदर होताच . ऐवढचं तो तिच्या वागण्यातून मालतीला झळकत नव्हता . आपल्या संसाराला आधीपासूनच ह्या कनिकामुळे ग्रहन लागलं असा खोटा गैरसमज मालतीने करून घेतला .कनिकात असं काय आहे जे आपल्यात नाही ? माझ्यासारखी बायकोही निरजला शोधून कुठे सापडणार नाही . म्हणातात ना प्रेम हे आंधळं असतं त्याचाच प्रत्यय तिला यायला लागला . दोन प्रतिस्पर्धी मध्ये श्रेष्ठ कोण ह्याचा जसा हेवा होतो तसचं काहीस मालतीला वाटतं होतं . तिकडे निरज मालतीला घरी ड्रॉप न करून देता कनिकाला घेऊन तिच्या रूमवर निघून गेला . मालती प्रेग्नेंट आहे हे ऐकून