प्रलय - १०

  • 9k
  • 1
  • 3.9k

प्रलय-१०      आज जलधि राज्याची राज्य सभा भरली होती .  महाराज विक्रम , त्यांची काळी भिंत पाडण्याची आज्ञा ,  अंधभक्त ,  या साऱ्यांवर ती आज निर्णय होणार होता .  राज्यसभेत सर्व मंत्रीगण , राज्यातील काही प्रतिष्ठित लोक , महाराज विश्वकर्मा म्हणजे रक्षक राज्याचे प्रधान ,  त्यांची मुलगी अन्वी ,  युवराज देवव्रत असे सर्व जण जमले होते .      प्रधानजी जलधि राज्यात पोहोचल्यानंतर कळालेल्या गोष्टींमुळे फारच आश्चर्य चकीत झाले .  अंधभक्तांची गोष्ट त्यांना भयकारक वाटली . अंधभक्तांना काळी भिंत अडवू शकत नाही म्हटल्या नंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला . संशोधन शाळेत झालेला किस्सा व त्यामागे असलेला मारूत राजाचा हात ऐकून