प्रलय - ५

  • 8.6k
  • 1
  • 4.4k

प्रलय-०५   " आता काय करायचं भिल्लवा , "  सरोज वैतागून भिल्लवाला म्हणाली  .  त्यांच्यासमोर वीस सैनिक व मागच्या बाजूला पाच सैनिक ,  असं त्यांच्या भोवती पंचवीस सैनिकांचा गराडा पडला होता .   महाराज विक्रम त्यांना देशद्रोही ठरवून फाशी द्यायला कमी करणार नव्हते . कसेही करून त्यांना प्रधानजींना घेऊन थेट तिथून जायलाच हवे होते . चौघेही लढायला सिद्ध झाले .  सैनिक त्यांच्यावर चाल करून येणार त्या अगोदरच त्यातील काही सैनिकांनी इतर सैनिकांना मारायला सुरुवात केली . सैनिका सैनिकांमध्ये लढाई सुरू झाली होती . या चौघांना काहीच कळेना हे काय चाललं होतं .  मागून आलेल्या सहा सैनिकांना या चौघांनी मिळून जागीच ठार केलं।