इंग्रजी साहित्यात ' चावट ' या सदरात मोडणार साहित्य प्रकार बऱ्यापैकी रुजलेला आहे. अर्थात त्याला पाश्च्यात मुक्त वातावरण आणि मुक्त विचारधारा कारणीभूत असतील. एकदम ' नागव 'लिखाण नसेल हि पण बरचस ' कमरे खालच 'असते. तसला प्रकार मराठी साहित्यात दुर्मिळच आहे. तरी या प्रकारातला एक कथा संग्रह माझ्या वाचण्यात आला आहे ! आत्माराम नीलकंठ अर्थात आनंद साधले यांच्या कथांचा तो संग्रह. त्यांची 'मातीच्या चुली' (आत्मचरित्र )आणि ' हा जय नावाचा इतिहास आहे '(महाभारतावरील ) हि पुस्तके चोखंदळ वाचकांच्या नजरेतून सुटणार नाहीत, तुम्हीही ती वाचली असतीलच. पंचाहत्तर वर्ष्याच्या आयुष्यात त्यांनी साठ पुस्तक लिहिली आहेत! त्यांच्या लेखना बद्दल लेखक / वाचक मंडळीत खूप