मला काही सांगाचंय.... - Part - 5 - 6

(16)
  • 16k
  • 10.2k

५. वास्तव अवास्तव असं घाई घाईत बोलून लगेच फोन ठेवल्यामुळे प्रशांत आणि त्याच्या आईला अनेक प्रश्न पडायला लागले होते...... कुमार कुठे आहे ?अजून घरी का आला नाही ?त्याचा मोबाईल कुणाला आणि कुठे सापडला? नेमकं काय झालं असेल ? तो ठीक तर आहे ना ? वेळेचे भान ठेवून प्रशांत म्हणाला.. " आई तू काळजी करू नकोस ... मी जाऊन येतो पोलीस स्टेशनला, तू घरीच थांब. बाबा पण लग्नाला गेले , परत यायचे आहेत अजून..." त्यावर आई त्याला म्हणाली ... "अरे शहराला आले असतील पण वाहन नसेल गावी यायला , नाहीतर थांबले असतील मित्राकडे उशीर झाला म्हणून." एवढं बोलून ती थांबली. प्रशांत