माझे आवडते कथाकार --व.पु. काळे !

  • 11.3k
  • 2.7k

कथा वाचनाच्या घनदाट जंगलातून वाट काढत असताना, वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात व. पु . नावाचा एक 'कथा'ळ पहाड लागतो. तो पार केल्याशिवाय मराठी कथा वाचनाचा प्रवास संपन्न होत नाही. व.पु.नच्या लेखणीने एक मोठा कालखंड व्यापला आणि गाजवला हि आहे. त्यांचा वाचक वर्ग प्रचंड आक्राळ विक्राळ आहे. कथा, कादंबऱ्या, ललित ,आणि वैचारिक आणि किती तरी लेखन त्यांच्या लेखणीतून प्रसवलय ! पण ते खरे रमले ते कथा लेखनातच. मी हि त्यांच्या बऱ्याच कथा वाचल्यात. पण त्यांच्या कथा वाचण्या पेक्षा त्या त्यांचाच तोंडून एकण्यात खरी लज्जत आहे! पु.ल.देशपांडे, द.मा.मिराजदार सारख्या दिग्गजांचे कथन मी ऐकल आहे पण व.पु.नचे कथा-कथन ---बात हि कुछ और है