फार्महाउस - भाग ५

  • 16.9k
  • 9.4k

एखादा कागदाचा तुकडा असेल आणि जर तो पाण्यात टाकला तर तो झिजून झिजून नष्ट होतो .  पण उलट त्याच कागदाच्या तुकड्याच्या काही घड्या घातल्या आणि होडी बनवली तर ती होडी पाण्यात तरंगते .  त्याच कागदाच्या तुकड्याच्या घड्या वेगळ्या पद्धतीने घातल्या तर तोच कागदाचा तुकडा हवेतही उडू शकतो . त्याचप्रमाणे परिस्थिती व अनुभव मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या व स्वभावाच्या अशा प्रकारे घडी घालतात की कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी तो त्याविरुद्ध लढतो .  अनुभव मनुष्याला बनवतात  , उभा करतात आणि जगवतात . आतापर्यंत गण्याने ही बऱ्याच चांगल्या-वाईट गोष्टी अनुभवल्या होत्या . त्या अनुभवावरून तो बरेच काही शिकलाही होता . त्यामुळे यावेळी तुरुंगात गेल्यावर