आजीचा बटवा- घरचा वैद्य.

(13)
  • 99.9k
  • 4
  • 26.1k

आजीच्या बटव्यातली काही गुपितं- उन्हाळा वाढला, हवा बदल झाला तब्येत बिघडू शकते. जर घरात कोणी आजारी पडल तर मदतीला धावून येते ती आज्जी आणि तिच्या बटव्यातील तिचे उपाय!! आज्जी नी वैद्यकीय अभ्यास केला नसला तरी तिच्या अनुभवातून तिला बरीच माहिती झालेली असते. असे किती साधे साधे बिनखर्चाचे आणि प्रभावी उपाय आणि उपचार. शिवाय हे सगळे उपाय सहजसुलभ मिळतात आणि अगदी हाताशीच असतात. आई, आजी, काकू, आत्या, मावशी, मामी सगळ्यांनाच असे कितीतरी उपाय माहीतच असायचे. परंपरेनं चालत आलेलं घरगुती शहाणपण म्हणजे खात्रीशीर गुणकारी!! काही त्रास व्हायला लागला कि लगेच डॉक्टर कडे पळायची गरज नसते. सोप्पे उपाय करून सुद्धा होणारा त्रास कमी