मात भाग ५

  • 27.3k
  • 2
  • 14k

"प्रतीकला खरंच काही माहीत नाही की तो आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे? पण नेमके काय? तो बोलताना चाचरत का होता? असे काय असावे की तो प्रतीक जो सुहास चुकल्यावर त्याचे कान पिळायलाही मागेपुढे पाहायचा नाही.. जो आपल्याला नेहमी आधार द्यायचा.. भांडणात बऱ्याचदा मध्यस्थी करायचा.. तो ही आपल्या मित्राच्या बाजूने त्याच्या लपवाछपवीत सामील असावा.. काय चालू काय आहे नक्की या दोघांचे.."रेवतीला काही सुचत नव्हते..प्रतीकची आणि तिची पहिली भेट तिला आठवली.. सुहासने त्या दोघांची एकमेकांशी ओळख करून दिली होती.. अगदी मोघम पाच मिनिटं बोलणं झाले असेल त्या वेळेस..पण त्यानंतर हळूहळू प्रत्येक भेटीगणिक प्रतीकशी वाढत गेलेली रेवतीची मैत्री.. तिला प्रतीकमुळे निखळ आणि निस्वार्थ