अजिंक्य नुकताच जमीनदार झाला होता.जमीनदार म्हणजे त्याने कोकणात स्वतःच्या मेहनतीवर जमीन घेतली होती.आवड होतीच त्याला.पण आता तिथे काहीतरी करण्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.एक वर्ष घरूनच प्रोजेक्टची कामं मिळवून त्याने कंपनीतून ठरवून ब्रेक घेतला होता.मनात आलं की उठला आणि निघाला.जरा अनवट वाटेवरचं गाव त्याने निवडलं होतं त्यामुळे पूण्यातून गावाला जाणारा रस्ताही तुलनेने कमी वाहतुकीचा असायचा..अजिबात घाई न करता भल्या पहाटे उठून आवरून तो शांतपणे निघाला एकटाच.गाडी सुरु केल्यावर लक्षात आलं की एसी काम करत नाही आहे.फक्त फॅनच चालू आहे...अरे देवा.. दहानंतर ऊन वाढणार आणि जीवाची काहिली होणार दुपारी पोचेपर्यंत... पण आज जायला तरं हवं होतं... जमिनीची मोजणी लागली होती