बलमवाँ तुम क्या जानो प्रीत...

  • 3.3k
  • 1
  • 1.5k

सजिली....स्वातंत्र्यपूर्व काळ.... स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी आणि सर्वच भारतीय निकराने लढत होते.सजिली या वातावरणातच भर तरुणाईच्या उंबरठ्यावर उभी होती. दिसायला आकर्षक नसली तरी तरतरीत होती. घरात दोन वेळा खायला मिळे आणि वर्षाला चार जोड कपडे. पाच भावंडांची आबाळ होऊ न देता वडिल आपला खाटीक व्यवसाय करत होते आणि आई घरी शिवणकाम करी.तिच बांगड्या भरायचं दुकानही होतं...सजिलीचा गळा मुळातून गोड. देवळातलं कीर्तन भजन तिला आवडे आणि मशिदीची बांगही...शाळेत जायचा प्रश्नच नव्हता पण स्वतःहून चित्र काढायला,गोधड्या शिवताना आईला मदत करताना त्यावर कापडांची नक्षी जुळवणं तिला आवडे.मोहल्ल्याला लागून थोडं पलीकडच्या रस्त्याला मंदिर होतं.तिथे सकाळ संध्याकाळ भजन चाले. काहीतरी निमित्त करून धाकटीला कडेवर घेऊन सजिली अर्धा