डाक्टरकी-श्वास

  • 8.8k
  • 2.5k

श्वास कुठल्याही केसमध्ये व्यवस्थित तपासणी करणं खूप महत्त्वाचं असतं.कारण खूपवेळा बाह्य लक्षणे जरी एखाद्या विशिष्ट प्रकारच्या आजाराकडे निर्देश करत असली तरीसुद्धा मूळ कारण अगदी वेगळं असू शकतं.ह्याबाबतीत प्रत्येक व्यक्तीनं सजग असलं पाहिजे आणि डॉक्टरनेपण प्रत्येक रूग्णाच्या बाबतीत अशी सजगता बाळगली पाहिजे. पण हा झाला नियम आणि तो अपवादानेच सिद्ध होतो.अशाच दोन केसटेकींग मधल्या त्रुटींमुळे जिवावर बेतलेल्या काही केसेस. गुलाबराव देशमुख...साधारण ४०-४५ चे गृहस्थ.माझ्या दवाखान्यात आले त्यावेळी त्यांचा आजार चांगलाच बळावला होता.सततचा खोकला,थोड्याशा श्रमानंही लगेचच धाप लागणं ह्या जुन्याच तक्रारी आणि त्यात भर पडली होती ती ताप ,सर्दी आणि घसा दुखण्याची.वय ४५चं असूनही ते ह्या सतत रोगट असणाऱ्या तब्येतीमूळे