रोझी

  • 3k
  • 1
  • 1.2k

चर्चमधे नवीन वर्षाची प्रार्थना सुरु होती. सजलेल्या चर्चचा रंगच अनोखा होता. सजलेले भाविकही नव्या वर्षाची स्वप्नं पाहत होते. गोव्याचा किनारा आणि किनारा उत्साही लोकांनी भरून आणि भारून वाहत होता.बारा वाजता चर्चचे टोल पडले.समुद्रातल्या बोटींनी भोंगे देत नव्या वर्षाचं स्वागत केलं....तिने येशूला प्रार्थना केली मनापासून आणि आपल्या स्वप्नाच्या दिशेने तिची वाटचाल सुरु झाली.रोझी.... आई वडिलांची लाडकी... गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात लहानाची मोठी झालेली... तारूण्याच्या उंबरठ्यावरच्या रोझीला नव्या लोकांना आपलं गाव दाखवायचं होतं. पण तिला फक्त महिला आणि मुलींनाच हे जग फिरवायचं होतं... ती गाडी चालवायला शिकली तेवढ्यासाठी. डॅडीच्या मागे लागून नवी गाडीही विकत घेतली.गोव्याचा कोपरा आणि कोपरा माहिती करून घेण्यासाठी ती वर्षभर