तसं बघितलं तर आपण ह्या निसर्गाचाच घटक अहो त्या निसर्गाशी संलग्न साधायलाआपल्याला काही त्राण नाही . सकाळी रोज पहाटे चारला उठून अर्धकाळोखात विलीन झालेल्या , चांदण्याचा पहुडलेला तो अवकाश लखलखुन टाकणारा सडा .... चंद्र आणि सोबतीला काळोख त्या प्रसंगी एवढा शुकशुकाट आणि शांतता विस्तारलेली असते . बहुतांश भविष्याची कितीतरी स्वप्न मी ह्याच प्रांगणात रोज सकाळी चारला बाहेर पडून अवकाशाकडे वर मानेने उघड्या डोळ्यांनी बघितलेली आहे .... माझा पूर्ण विश्वास आहे ते खरेही होतात . ती हवा आपल्या बाहुपाशात एक वेगळीच ऊर्जा शक्ती आणि बळ आपल्याला देऊन जाते . एकदा करून बघा खूप आनंद होईल .... आणि हे एकदा नाही तर रोज रोज