मुलांना बाहेर ठेवताना..

  • 8.5k
  • 2.1k

मुलांना बाहेर ठेवताना.. सुमिञा ऊर्फ सुमी ७ वी ला शाळेतुन पहिली आली पण गावात पुढिल शिक्षणाची सोय नव्हती. म्हणुन सुमी आणि तिचा छोटा भाऊ संतोष या दोघांनां जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय त्यांच्या आई वडिलांनी घेतला. काही ओळखीच्या माणसांच्या मदतीने ओळखीच्या ठिकाणी एक दहा बाय दहा ची रुम भाड्याने घेण्यात आली. शाळेपासुन रुम जवळच असल्याने जाण्या येण्याचे टेंशन नव्हते. डाव्या बाजुला दहा बाय दहा च्या , सुमिची रुम पकडुन , सलग तीन रुम होत्या. सर्वात पहिली रुम सुमिची. दुसर्या रुममध्ये घराची मालकीण , ज्यांना प्रेमाने सर्व माय म्हणत ,तिची होती. तिसरी रुम त्यांचा मुलगा आणि सुन यांची होती. या