अभय शांतपणे मला समजवत होता अभयच बोलणं ऐकून माझ्याचेहऱ्यावर मंद स्मित पसरले पण अचानक त्याचा आवाज किंचित बदलला ....' निराशा पूर्णपणे वांझोटी आहे रेवा , जी कधीच फलश्रुती देत नाही ... सृजनात्मक शक्तीच्या आसपासही ती आपल्याला भरकटू देत नाही . तुझीही निराशा कळते अगं मला , मी दोन वर्षे तुम्हाला भेटायला आलेलो नाही हो ना ! अगं मी दोन वर्षे माझ्या घरचाना तरी कुठे म्हणून भेटलो मी माझ्या कार्यात पूर्णपणे गुंतलो होतो अगदी कात्रीत सापडलो होतो .मला त्यातून बाहेरही पडता येत नव्हतं .. तिथे मी पहिल्यावर्षी एका सामाजिक संस्थेलाही जॉईन झालो स्टडी आणि अनाथ मुलांना शिकवायला जाणं त्यांच्या गरजा