माझी शाळा आणि आमच्या बाई हि गोष्ट आहे साल १९९७ .. जेव्हा माझ्यासारखे अनेक मुले मुली या ठिकाणी एकत्र झाले ते म्हणजे माझी शाळा .. वयवर्ष ५ ह्या वयात.. काहीच माहीत नसतं ..आणि आपल्या आई वडिलां पासून दूर केलं जातं तो त्रास तर खूप होता कारण अनोळखी.. मुलं मुली. त्यात अनोळखी शिक्षिका .. खर तर खूप घाबरलो होतो तेव्हा मी.. की कशाला ज्याचं शाळेत.. पण आई आणि बाबा ह्यांची स्वप्न असतात की आपला मुलगा चांगला शिकला पाहिजे.. आणि मोठा होऊन चांगला मोठ्या हुद्द्यावर असायला पाहिजे.. ही आपल्या आई वडील यांची स्वप्न.. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले आई वडील आपल्याला शाळेत टाकतात...