स्पर्धेच्या पलीकडे - (भाग ३)

  • 4.5k
  • 1.9k

स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग ३) इथुन पुढे मात्र त्यांची खरी कसोटी होती. सिंहगड चढणे आणि सायकल चालवणे या मध्ये फरक होता. सायकल चालवायची त्यांना सवय होती, त्या उलट गड मात्र ते क्वचितच चढत असत. गड चढायला सुरुवात केल्यावर पाचच मिनिटात स्पर्धा किती कठीण होणार आहे याची जाणीव झाली. त्यांच्या जवळचे पाणी वापरायला त्यांनी सुरुवात केली होती. थकवा जाणवायला सुरुवात झाली होती. केवळ घाई करून गड चढल्याने जिंकता येणार नाही हे त्यांना जाणवले. त्यामुळेच त्यांनी आपापल्या धोरणात बदल केले. राहुलने आपली चाल मंद केली. तो आता आपली ऊर्जा वाचवून पुढे जात होता. त्या उलट मंदार अधिक धोक्याची वाट पकडून वेळ वाचवण्याचा