मर्द सह्याद्रीचा

(21)
  • 7.8k
  • 5
  • 2k

दरवाज्या बंद होण्याच्या आधी काही वेळ एक तोफेचा बार केला जाई म्हणजे आता दरवाजा बंद होणार अशी माहितीवजा ती सूचना होती, त्या आवाजा नंतर एक दोन घटकेचा काळ लोटला कि रायगड किल्ला बंद होत असे त्यानंतर तो सकाळी उजाडल्या शिवाय उघडत नसे, गणाला असे वाटत होते की मनोगती यावी अन क्षणात महाराजांना पुढे उभे राहावे पण नियतीपुढे तो बेहाल होता, त्याच्या कष्टाची आणी स्वामिभक्तीचि आज परीक्षा होती, तो त्याच्या देवाला हेच गाऱ्हाणे घालत होता कि माझा संदेश महाराजांच्या चरणी पोहोच व्हावा. मग देह पडला तरी चालेल, पण तोपर्यंत तरी काही श्वास मला दे उधार ही चलबिचल चालू असताना त्याच्या कानावर तोंफांचा आवाज आला. अन आता औंदाघटकेत गडाचे दरवाजे बंद होणार....