अ सब्जेक्ट ऑफ रिवोल्युशन खूप दिवस झाले मिस्टर वाघला भेटून. त्याच्या घरी जाण्याची माझी काही हिंमत होत नाही (कशी होईल? हा घरात विषारी साप पाळतो). तोच येतो अधून मधून माझ्याकडे. पण बरेच दिवस तो माझ्या घराकडे फिरकलाच नाही. पण काल येऊन गेला. ते एक बरे आहे, की आई घरी नसतानाच हा येतो. नाही तर माझे अशा माणसाशी संबंध आहेत म्हंटल्यावर तिला खूप धक्का बसेल, काळजीत पडेल ती... ही मला वाटणारी भीती त्याला जाणवली असावी कदाचित. म्हणूनच तो कधी आई असताना येत नाही, पण तसे त्याने कधी स्पष्ट सांगितले नाही. ब्लॅक ब्लेझर,