आईस पत्र

  • 51.6k
  • 2
  • 10.1k

प्रिय आई,      तू कदाचित हसशील,वेडी म्हणशील.कारण मी तुला पत्र लिहिते म्हणून.हल्ली एकत्र रहाणार्या माणसांचा एकमेकांशी संवाद कमी झालाय,तिथे पत्र लिहिण तर दूरच.पण मला खूप मनापासून जाणवल की तुला पत्र लिहाव.    तू आमच्या साठी जे केल ते शब्दांत मांडण कठीणच,खरतर प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी जे करते त्याचे उपकार कधीच फिटू शकत नाही.तू आमच्या साठी दिवसरात्र एक केला.आमच आजारपण आमची शाळा,हे सगळं तू सांभाळलस.नानांच्या सामाजिक कार्यामुळे संसाराचा गाडा तू खरतर एकहाती पेललास.पण तेव्हा आम्हांला त्याची जाणीव झालीच नाही कधी.तू जे करतेस ते तुझ कामच आहे,आणि तू ते करायलाच हव असच वाटायच.  आमची शाळा,कॉलेज,मित्रमैत्रीणी या विश्वातच आम्ही दंग राहिलो,पण तुझी