मृगजळ ( भाग -7)

(39)
  • 7.2k
  • 4
  • 2.9k

पराग श्री च्या संपर्कात होताच . पराग आज आयआयटी मध्ये प्राध्यापक म्हणून रूंजू होता .काही अॉफीसच्या कामासाठी त्याला दिल्लीला जाण्याचा योग आला .आजही तो आराध्याचा शोधात होता तिला सॉरी म्हण्यासाठी ... त्याचा एकट्याचा चुकीमुळे दोनमित्र दुरावले होते ... त्या मित्रांना त्याला एकत्र हसताना एका पलेटेमध्ये खाताना बघायचं होतं सर्व राग रूसवे विसरून ... आणि हे सत्य आशुतोष पर्यत आराध्याच पोहचवू शकणारं होती .. पराग दिल्लीत येऊन पाच दिवस झाले तो एका फायस्टार हॉटेल मध्ये थांबलेला होता ... त्या रात्री त्याला तिथे सेम आराध्या सारखी मुलगी दृष्टीस पडली ... तो आपल्या मेंमबरसला समोर पाठवून त्या खुर्चीकडे वळला ती मुलगी आपल्या मैत्रीनींन सोबत तिथे डिनरला आली होती