रुहि - एक सांगीतिक प्रवास

(2.2k)
  • 10.8k
  • 2
  • 3.1k

 रुहि, एक चाइल्ड प्रॉडजी. अगदी लहानपणापासून तिने संगीतात प्राविण्य मिळवलं आहे. संगीत तिचा प्राण आहे आणि ती स्वतः संगीताचा आत्मा आहे. संगीत क्षेत्रात ऊंची गाठणं, एक चांगली गायिका होणं, एवढंच तिचं स्वप्न आहे. तिचा ध्यास आहे, फक्त आणि फक्त संगीत... या क्षेत्रात मिळणारा पैसा, नांव, प्रसिद्धी, लोकप्रियता अशा गोष्टींशी तिला काही देणं घेणं नसतं. तिची आस्था फक्त संगीतावरच असते. तरी लहान वयातच ती आपल्या गानकौशल्यानं प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली असते. पण एवढ्यावरच तिला थांबायचं नसतं. संगीतातील हर एक गोष्ट शिकणं, स्वतःमध्ये ते भिणवणं व आपल्या स्वरांवाटे ते सर्व व्यक्त करणं एवढंच तिचं लक्ष्य असतं. पण कदाचित नियतीला हे मान्य नसतं. एक दिवस गाताना तिच्या