पूल -लघुकथा

  • 8.6k
  • 2.5k

“अयss निरमे, सरळ साळत जा... अन सुटलीकी घरला ये,त्या उंडगी बरोबर हुंदडत नको बसूस डोक्यावरची चाऱ्याची पेंढ अंगणात टाकत निर्मलाच्या आईने तिला तंबी-वजा सूचना दिली. व्हय पाठीवर दप्तर चढवत निर्मला बोलली. मग कमी ताकद असलेल्या डाव्या पायाच्या गुढग्यावर हात ठेऊन पायाला आधार देत निर्मला अंगणातून चालत बाहेर पडली.पक्षांच्या चिवचिवाटाने शिवार गजबजून गेलं होतं. पाना-फुलांवर दवाचे मोती झळाळले होते. नदीपलीकडच्या शाळेत जायला एकावेळी दोन माणसे जाऊ शकतील असा भिंती नसलेला जुना पूल होता. अख्ख गाव यापुलाचा वापर करत असे पण निर्मला यापुलावरून न जाता पाच कोसावर दोन गावांच्या वेशीवर बांधलेल्या नव्या सुरक्षित पुलावरून जात कारण मैत्रिणींच्या आश्वासनामूळे दोनवेळा