मायेचे पंख

(15)
  • 13.2k
  • 3
  • 4.2k

चार घोट मिळाल्याप्रमाणे माधव ही आजीच्या स्पर्शाने टवटवीत झाला. आजीचे बोट धरुन तो त्या भव्य इमारतीत असलेल्या त्याच्या सदनिकेजवळ आला. आजीने कुलुप काढल्याबरोबर आजीला ढकलत माधव घरात शिरला. विस्तीर्ण बैठकीत असलेल्या सोफ्यावर पाठीवरचे 'ओझे' फेकले. कोपऱ्यात जणू त्याचीच वाट पाहात असणाऱ्या त्याच्या कारकडे तो धावतच गेला. कारमध्ये बसताच त्याला प्रचंड आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात त्याने कार पळवायला सुरूवात केली. त्यावेळी तो त्या बैठकीचा महाराजा होता. एका तासाने म्हणजे बरोबर सहा वाजता त्याचे आईवडील कंपनीतून येणार होते. माधवा, झाले का तुझे सुरू? आधी हातपाय धुऊन घे. काय खायचे ते सांग आणि मग कार पळव. थांब ना ग आजी. दिवसभर मला कारमध्ये बसायला मिळते का? माधवने विचारताच आजी म्हणाली,