खरा मित्र - 5

  • 19k
  • 3
  • 3.8k

एक होता राजा. त्याला दोन राण्या होत्या परंतु दोघींनाही मूलबाळ नव्हते. आपल्या राज्याला पुढे वारस कोण, असा विचार मनात येऊन राजा दु:खी होई. कशाला हे राज्य, कशासाठी ही धनदौलत, ही कोणाच्या स्वाधीन करू, असे विचार सारखे त्याच्या मनी घोळत. राजाचे दु:ख पाहून राण्याही दु:खी होत्या. एके दिवशी कोणी तरी एक बोवा आला होता. एक राणी तेथे होती. राणी रडत होती. बोवाजी म्हणाला, 'राणी, राणी तुझ्या डोळयांत का पाणी? राजाची राणी असून दु:खी का? दासदासी पदरी असून दु:खी का? रथ, घोडे हत्ती असून दु:खी का? तुम्हाला काय कमी? तुम्हाला कसला तोटा? तुम्हासारख्या श्रीमंतांनी रडावे मग गरिबांनी काय करावे? देवाने तुम्हाला भाग्य दिले. रडू नका, रूसू नका, सुखाने नांदा.'