प्रेरक -विचार भाग - ३

  • 8.1k
  • 1
  • 3.1k

नवरा-बायको पुढे आई-बाबा या भूमिकेत शिरतात .आणि या नवीन जबाबदारीच्या ओझ्याने गोंधळून जातात ,काहीजण नको तितके दक्ष होऊन लक्ष देण्याचा अतिरेक करतात आणि आपल्या बालकांना परेशान करून टाकीत असतात .. आई-बाबांचे आपल्या मुलांकडे लक्ष असणे , ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ..मुलं घरात आणि बाहेर कशी वागतात ?, शाळेत कशी वागतात ,सगळ्यांशी त्यांचे मित्रत्वाचे नाते आहे काय ? मुलांना योग्य संगत लाभली आहे का ? या काळजीच्या आणि चिंता करण्याच्या गोष्टीकडे प्रत्येक आई-बाबांचे लक्ष असणे गरजेचे आहे. यासाठी .,वेळेवर लक्ष दिले तरच .. मुलं भरकटणार नाहीत ,आणि दुर्लक्ष झाले तर वेळेवर लक्ष दिले नाही याचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल हे पण लक्षात ठेवावे .