सोनसाखळी - 3

(13)
  • 15.4k
  • 2
  • 8.7k

एक होता राजा. त्याला शिकारीचा फार नाद. एकदा तो शिकारीसाठी गेला व रस्ता चुकला. भटक भटक भटकला. रानात त्याला एक लहानसा गुराखी भेटला. तो गायी चारीत होता, पावा वाजवीत होता. राजा त्याला म्हणाला, मुला मला रस्ता दाखवतोस? मुलाने विचारले, तुम्ही कोण? तो म्हणाला, मी राजा. गुराखी म्हणाला, राजासुद्धा रस्ता चुकतो! आम्ही नाही बा कधी चुकत. अंधारातसुद्धा नेमके घरी जाऊ. राजा म्हणाला, मुला तू हुशार आहेस. कोण तुला शिकवते? गुराखी म्हणाला, मला, कोण शिकविणार? झाडे, माडे, फुले, पाखरे, नद्यानाले हे माझे मित्र. गायी चारतो, घरी जातो. आई भाकर देते ती खातो. राजा म्हणाला, कोठे आहे तुझी आई? गुराखी म्हणाला, जवळच आहे झोपडी. येता का आईकडे! राजा म्हणाला, चल. दोघे निघाले. झोपडी आली. गुराखी म्हणाला, आई, आई आपल्याकडे राजा आला. हा बघ. म्हातारी लगबगा बाहेर आली. तिने घोंगडी घातली. राजा म्हणाला, म्हाताऱ्ये, तुझा मुलगा हुशार आहे.