सोनसाखळी - 2

(17)
  • 18.7k
  • 13.3k

एक होता दगडफोड्या. गाढवांवर दगड घालून तो नेहमी नेत असे. एके दिवशी दगड लादलेली गाढवे घेऊन तो झा झा करीत जात होता. तो त्याला वाटेत शिपायांनी अडविले. ते त्याला म्हणाले, हा रस्ता बंद आहे. राजेसाहेबांची स्वारी या रस्त्याने जाणार आहे. माहीत नाही का तुला, दिसत नाही का तुला? चालला गाढवे घेऊन. गाढवच दिसतोस. तो दगडफोड्या म्हणाला, मी असा राजा असतो तर किती छान झाले असते. मग मला कोणी अडविले नसते. मीच साऱ्यांना अडविले असते. त्याच्या मनात असे आले नाही तोच त्याच्यासमोर एक देवता उभी राहिली. तिने त्याला विचारले, तुला काय राजा व्हायचे आहे?