प्रवास वर्णन - केरळ आणि मी...

  • 119.7k
  • 3
  • 28.2k

१ ऑक्टोबर २०१७ ला आमचं केरळ भटकंतीवर स्वार व्हायचे अचानक ठरले आणि माझ्या मनातल्या मनात आनंद..उत्साह...रोमांच....अश्या भावनांना भरती येण्यास सुरवात झाली.आई,बाबा,भाऊ,मी आणि माझे मामा,मामी आणि बहिणी असे मिळून ८ जणांची टीम भटकंतीच्या स्वारीस निघाली होती.भटकंती हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे.वेगवेगळ्या नवीन राज्यात भटकंती करत जाणे,रोड ट्रीप वर जाणे,नवीन लोकांना भेटणे ह्या माझ्या अत्यंत आवडीच्या गोष्टी आहेत.नेमकं ह्यावेळेस दिवाळी दरम्यान भटकंती असल्याने घरात दिवाळी साजरी करता येणार नाही हे मला जाणवत होते.पण भटकंती चा उत्साह माझ्या अंगात रोमांच निर्माण करत होता आणि ह्यावेळेस विमानप्रवास असल्याने माझा उत्साह शिगेला पोहोचला होता.एव्हाना माझे मन केव्हाच केरळ च्या भटकंतीवर निघाले होते.आमची भटकंती ची