रहस्य कथा- नीलिमा..-१

(13)
  • 4.5k
  • 1.5k

नीलिमा एक खूप निरागस मुलगी होती. निरागस आणि तशी अल्लडच होती ती. वयाने लहान त्यामुळे समज सुद्धा कमीच होती. पण तिला शिकायची मात्र खूप आवड होती. ती जिद्दीनी शाळेत जाऊन १० वी पर्यंत शिकली पण आजूबाजूच्या परिस्थितीच भान तिला कधी न्हवत. गावात लग्न लवकर होतात त्याचप्रमाणे तिच सुद्धा लग्न लवकर झाल. न कळत्या वयात लग्न झाल आणि आता नीलिमानी जरा समजूतदारपणे वागायची गरज होती पण नीलिमा मात्र मोठी होतच न्हवती.