संगीत शारदा - अंक - 4

  • 13.1k
  • 4.2k

संगीत शारदा - अंक - 4 प्रवेश पहिला ( स्थळ : कांचनभटाचें घर ) कांचन० : या अलीकडच्या पोरी म्हणजे मोठया धाडसी ! त्या शुभंकराच्या मुलीला पोरीपोरींनी सहज म्ह्टलं कीं तुला नवरा पाहिला आहे तो बायकांसारखं बोलतो. हें ऐकल्याबरोब तिनं जाऊन जीव दिला ! तसं जर कांहीं वेडा आमच्या पोरीच्या डोक्यांत शिरलं तर आमचं हुंडायाचं, तैनातीचं, आणि त्यावर श्रीमंत होण्याचं मनोराच्या जागच्या जागीं ढांसळून जायचं. तें कांहीं नाहीं. आजचा आणि उद्यांचा दिवस डोळ्यांत तेल घालून पोरीला जपलं पाहिजे, एकदां तिच्यावर अक्षता पडून आमच्या पदरांत पुरी रक्कम पडली, म्हणजे अर्धा निश्चिंत झालों. मग तिनं कांहीं केलंन तरी फार तर तैनातीलाच गोता बसेल. ( आंत पाहून ) काय ग ए, आज तरी जेवली का नीट