The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
आत्महत्या आणि मी..? हसत्या चेहऱ्यावर रेंगाळत आलेली ती हलकीशी निराशा. हसु कोमजुन टाकुन गेली.निराशेच्या गर्द अंधारात ढगांच्या गडगडाटात विजांची ती जीवघेणी चमक जगण्यातला होता नव्हता तो प्रकाश हिरावु पहात होती.निस्तेज पडलेल्या वाटेचा हा वाटसरू बेभान सैरावैरा धावतोय.घाबरलाय खुप सारा आता या चराचरात पसरलेल्या दुःखाच्या पाउलखुणांना.जीव वाचवण्यासाठी धडपडन तरीही पळत राहणं एवढंच उरलं बाकी. निराशेचा तो सापळा हळू हळू त्याचा फास घट्ट करत होता.लटकलेले पाय,फासासोबत वर वर जाणारा तो देह,डोळे सताड उघडे जणु क्षणात येणाऱ्या मृत्यूची चाहूल देऊ पाहत होती.सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पाऊस ओघळत्या अश्रूंचा पुरावा मिटवत होता.लख्ख विजांचा तो कडकडाट काळजातून निघणाऱ्या प्रत्त्येक आवाजाला स्वतःमध्ये सामावू पहात होती.अचानक पडलेला विजेच्या प्रकाशात याच्या चेहऱ्यावरच ते तेज धगधगत्या अग्नीला ही लाजवत होत.ती रात्र भयाण होती.माळरानावर चिट पाखरू नजरेस पडत नव्हतं.पायांची ती तडफड,आवळता तो फास दोन्ही हातांनी तो सोडवण्याचा केविलवाणा अपयशी प्रयत्न आता काहीसा श्वास बाकी राहिलेला जीव करू पाहत होता.क्षणात मृत्यु दिसतोय आता आलाच आता सम्पलाच हा तरीही त्याचा आकांत या बेभान अन तेवढ्याच निर्दयी नियतीपुढं त्वेषाने लढू पाहत होता.कारण हरणं याला जमलं नाही कधी. प्रत्येक श्वासांची किंमत तो जाणून होता.तो फक्त एका छोट्याशा श्वासाच्या संधी साठी आटापिटा करत होता.ती भेटणार होती हे मनोमन जाणून होता तो.
Copyright © 2026, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser