Quotes by मयूर कविता वाघ in Bitesapp read free

मयूर कविता वाघ

मयूर कविता वाघ

@qrtwnyoq5023.mb


भूक..
भुकेजलेली आर्त हाक भूक
तळमळ उदरातील दाह भूक
तनमन वणव्याची आग भूक
निखार्यातील धगधगता लाव्हा भूक
चिमुकल्या काळजातील त्रीव चर्रररर भूक
मित.
-मयूर वाघ

Read More

रिमझिम पावसातील माणुसकीचा सुखद गारवा.. चिंब भिजलेल्या मनाला देई अटूट मायेचा ओलावा..
देवालाही हेवा वाटावा पाहून हा अविट गोडवा..
-मयूर वाघ?
#KAVYOTSAV

Read More

विरहाच्या सागरात मी एवढा पार बुडालो होतो की, अश्रूंच्या लाटा कधी कविता बनून बाहेर पडल्या हेही माझे मलाच कळाले नाही.
#KAVYOTSAV
-मयूर वाघ?

Read More

मैत्री..

मैत्री म्हणजे आपुलकी, जिव्हाळा, अटूट मायेचा ओलावा.
सर्व नात्याहूनी श्रेष्ठ असे दोन जिवांचे प्रेम म्हणजे मैत्री..
रक्तापलीकडील एक जिवापाड नातं म्हणजे मैत्री..
संकटकाळी अश्रू पुसण्या पुढे येणारे हात म्हणजे मैत्री..
एकमेकांचे गुणदोष पोटात सामावनारी भुक म्हणजे मैत्री..
मनातले भाव सहजतेने जेथे व्यक्त होते अशी मायेची शिदोरी म्हणजे मैत्री..
श्रद्धा, निस्वार्थ भाव, विश्वास म्हणजे मैत्री..
शेवटचा अंतिम श्वास म्हणजे मैत्री..

-मयूर वाघ?
#KAVYOTSAV
9096446755

Read More

प्रत्येक गोष्टीत आनंद मिळण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही, जर चेहर्‍यावर हास्य आणि समाधान असेल तर तीच खरी मनाची श्रीमंती जे की ती पैशाने सुद्धा विकत घेता येणार नाही अशी अनमोल आणि निरागस.
मित.
-मयूर वाघ?
#KAVYOTSAV

Read More